---Advertisement---

रतन टाटा जीवनचरित्र: उत्तराधिकारी, संपत्ती, पुरस्कार, शिक्षण, जन्म, व्यवसाय आणि बरेच काही

|
Facebook
रतन टाटा जीवनचरित्र | Ratan Tata Biography Marathi
---Advertisement---

रतन टाटा हे एक भारतीय उद्योगपती आणि टाटा सन्सचे माजी अध्यक्ष होते. त्यांचा जन्म २८ डिसेंबर १९३७ रोजी सुरत येथे झाला. ते नवल टाटा यांचे पुत्र आहेत, ज्यांना टाटा समूहाचे संस्थापक जमशेटजी टाटा यांचे पुत्र रतनजी टाटा यांनी दत्तक घेतले होते. रतन टाटा यांचे वयाच्या ८६ व्या वर्षी निधन झाले आहे. वयाच्या आरोग्याशी संबंधित समस्यांमुळे मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात ९ ऑक्टोबर २०२४ रोजी त्यांचे निधन झाले.

पूर्ण नाव रतन नवल टाटा
वय ८६ वर्ष
जन्म तारीख २८ डिसेंबर १९३७
कुटूंब नवल टाटा (वडील)
सुनि टाटा (आई)
जन्मस्थान सुरत, भारत
शिक्षण कॉर्नेल विद्यापीठ
हार्वर्ड बिझनेस स्कूल
व्यवसाय उद्योगपती,
टाटा समुहाचे पूर्व अध्यक्ष,
परोपकारी,
गुंतवणुकदार
विवाहीत स्थिती अविवाहीत
संपती ३८०० कोटी
पुरस्कार पद्म भूषण (२०००)
पद्म विभूषण (२००८)
ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया (२०२३)
मृत्यु ९ ऑक्टोबर २०२४, मुंबई

प्रारंभिक जीवन आणि शिक्षण-

रतन टाटा जीवनचरित्र | Ratan Tata Biography

रतन टाटा यांचे शिक्षण मुंबईच्या कॅम्पियन स्कूलमध्ये झाले. त्यानंतर त्यांनी कॅथेड्रल आणि जॉन कॉनन स्कूल आणि शिमला येथील बिशप कॉटन स्कूलमध्ये शिक्षण घेतले. पुढे त्यांनी न्यू यॉर्क येथील रिव्हरडेल कंट्री स्कूलमध्ये पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. १९५९ साली त्यांनी कॉर्नेल विद्यापीठातून वास्तुशास्त्रात(Architect) पदवी प्राप्त केली आणि १९७५ मध्ये हार्वर्ड बिझनेस स्कूलमधून व्यवस्थापन कार्यक्रम(Advanced Management course) पूर्ण केला.

कारकीर्द –

  • रतन टाटा यांनी १९६३ मध्ये टाटा समूहात प्रवेश केला. सुरुवातीला पहिले ६ महिने टाटा मोटर्स मध्ये प्रशिक्षण (Training) घेतली. त्यानंतर टाटा स्टीलच्या शॉप फ्लोअरवर काम केले. त्यांनी Tata Steel मध्ये Technical officer म्हणून join केलं आणि कामाला सुरुवात केली.
  • १९७० मध्ये त्यांनी TCS मध्ये पण काम केलं. १९७१ मध्ये त्यांना Nelco कंपनीचे Director बनवण्यात आले की जी कंपनी पहिल्या पासुनच घाट्यामध्ये (loss) होती, तीच कंपनी रतन टाटा यांचा नेतृत्वाखाली नक्यामध्ये(profit) आली. Nelco चा यशानंतर त्यांना Tata ची primary company Tata Sons चे Director बनवण्यात आले.
  • १९८१ मध्ये त्यांना Tata Industries चे director बनविण्यात आले. १९८३ मध्ये FMCG Sector मध्ये रतन टाटांचा नेतृत्वाखाली Tata नमक launch केलं. १९८३ मध्ये Air india चे काही काळांसाठी Chairman बनले.
  • २५ मार्च १९९१ मध्ये जे.आर.डी. टाटा यांच्या निवृत्तीनंतर ते टाटा समूहाचे अध्यक्ष (chairman) झाले. रतन टाटा जीनी कंपनीमध्ये Retirement age संकल्पना घेऊन आले. त्याच्यांच नेतृत्वाखाली टाटा ग्रुप भारतीय मार्केटमध्ये तसेच इंटरनेशनल मार्केटमध्ये कंपनीने पाय पसरायला सुरुवात केली.
  • सन २००० मध्ये Tetley जो एक ब्रिटीश ब्रॅड आहे त्यांला विकत घेतले. त्यावेळी एक छोटी सी Tata Tea कंपनीने Tetley जश्या मोठ्या कंपनीला विकत घेतलं होतं. टेटली टी या कंपनीने टाटाच्या ग्राहक पोर्टफोलिओमध्ये विविधता आणली आणि या समूहाला जागतिक चहा बाजारपेठेत एक प्रमुख खेळाडू म्हणून स्थापित केले. त्यांच वर्षी २००० साली रतन टाटा यांना पद्म भूषण या पुरस्काराने सन्मानित करण्यात झाले जो की भारताचा तिसरा सर्वांत मोठा पुरुस्कार आहे.
  • २००४ मध्ये त्यांच्याच नेतृत्वाखाली TCS या कंपनीचा IPO(Initial public Offering) launch केला, आणि आज TCS भारतातील दुसरी सर्वांत मोठी कंपनी आहे. Tata समूह चा सर्व कंपन्यांमध्ये TCS एक कंपनी ही ९०% नफा(profit) देते.
  • २००६ मध्ये DTH Service मध्ये Tata Sky launch केलं. तसेच २००७ मध्ये कोरस स्टील या कंपनीला खरेदी केले आणि जागतिक स्तरावर पोलादाची दिग्गज कंपनी म्हणून टाटाचे स्थान मजबूत केले आणि त्याची उत्पादन क्षमता वाढवली.
  • तसेच, २००८ टाटा समूहाने जग्वार आणि लँड रोव्हर यांसारख्या मोठ्या ऑटोमोटिव्ह कंपन्या खरेदी केल्या. जॅग्वार आणि लँड रोव्हर यांच्या खरेदीमुळे टाटाच्या ऑटोमोटिव्ह पोर्टफोलिओला बळकटी दिली आणि लक्झरी कार बाजारात आपली उपस्थिती वाढवली. २००८ साली त्यांना भारताचा दूसरा सर्वांत मोठा पुरस्कार पद्म विभूषण या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
  • त्यांच्या कार्यकाळात टाटा इंडिका, भारताची पहिली स्वदेशी कार तसेच, २००८ मध्ये टाटा नॅनोची घोषणा केली, जी जगातील सर्वात स्वस्त कार बनविण्यात आली.
  • २८ डिसेंबर २०१२ साली chairman पदावरून निवृत्ती घेतली. आणि सायरस मिस्त्री यांना chairman म्हणून नियुक्त करण्यात आले. १२ जानेवारी २०१७ पासुन नटराजन चंद्रशेखरन Tata Sons चे चेअरमन आहेत. आताच्या घडीला, Tata समुह चा ६०% revenue आंतरराष्ट्रीय मार्केट मधून येतो.
  • रतन टाटा यांनी त्यांची वैयक्तिक बचत Snapdeal, Teabox, Cashkaro.com, Ola Cabs, Xiaomi, Nestaway आणि Dogspot मध्येही गुंतवणूक केली.
  • २०२३ साली ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया हा पुरस्कार देण्यात आला.
रतन टाटा जीवनचरित्र | Ratan Tata Biography

रतन टाटांचे ५ मजेदार किस्से –

१. एक फोन कॉलवर बदललेले जीवन – त्यांच्याबद्दल सर्वांना माहित असलेल्या गोष्टींपेक्षा कमी प्रसिद्ध असलेली एक गोष्ट म्हणजे त्यांच्या साधेपणाची आणि लोकांशी जुळून घेण्याची वृत्ती. २०११ मध्ये मुंबईत एका लहान दुकानातील कामगाराने रतन टाटांना थेट फोन केला. त्याचे कामकाज बिकट अवस्थेत होते, त्यामुळे त्याने मदतीची याचना केली. रतन टाटा यांनी त्या फोन कॉलला त्वरित प्रतिसाद दिला आणि त्या कामगाराच्या मदतीसाठी आर्थिक मदत केली. रतन टाटा यांच्या मते, “आपण आपल्याला मदतीची गरज असलेल्या लोकांपासून दूर जाऊ शकत नाही.”

२. नॅनो कार प्रकल्पाच्या मागे असलेली कथा – त्यांना मध्यमवर्गीय भारतीयांसाठी एक परवडणारी कार बनवायची होती. नॅनो कारच्या प्रकल्पाच्या मागे एक मनोरंजक गोष्ट आहे. एकदा त्यांनी रस्त्यावरून जाताना पाहिले की, एक संपूर्ण कुटुंब एका स्कूटरवर बसून जात होते. वडील स्कूटर चालवत होते, पत्नी मागे बसलेली होती, आणि दोन लहान मुले मध्ये होती. याने त्यांना प्रभावित केले, आणि त्यांनी ठरवले की भारतीय कुटुंबांसाठी सुरक्षित आणि स्वस्त वाहन असावे. त्यातूनच नॅनो कारचा जन्म झाला.

३. मुलांच्या शिक्षणासाठी सतत पाठिंबा – त्यांनी फक्त उद्योगक्षेत्रातच नव्हे तर शिक्षणाच्या क्षेत्रातही मोठे योगदान दिले आहे. १९७० च्या दशकात, त्यांनी त्यांच्या कंपनीतील कर्मचार्‍यांच्या मुलांना शिक्षणासाठी मदत करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी स्वतः एक शिक्षण योजना सुरू केली आणि हजारो विद्यार्थ्यांचे शिक्षण सुलभ केले. या उपक्रमात त्यांनी फक्त आर्थिक मदतच केली नाही, तर शिक्षणाच्या गुणवत्तेवरही विशेष लक्ष दिले.

४. लिव्हिंग सिम्प्ली (साधी राहणीमान) – त्यांच्या साध्या जीवनशैलीबद्दल कमी लोकांना माहित आहे. मोठा बिझनेस टायकून असूनही, त्यांच्याकडे कोणतीही आलिशान गाडी नाही, मोठे बंगले नाहीत. त्यांची साधी राहणी त्यांच्या वैयक्तिक मूल्यांशी सुसंगत आहे. त्यांनी कधीही श्रीमंतीचे प्रदर्शन केले नाही आणि ते नेहमीच सामान्य लोकांसारखेच वागत आले आहेत. त्यांच्या साधेपणाचा आदर्श अनेकांना प्रेरणा देतो.

५. डॉग लव्हर: कुत्र्यांवर असलेले प्रेम – रतन टाटा यांचे प्राणी प्रेमही खूप कमी लोकांना माहित आहे. विशेषतः ते कुत्र्यांचे खूप मोठे प्रेमी आहेत. मुंबईतील टाटा मुख्यालय, बॉम्बे हाऊस, हा एकमेव कार्यालय आहे जेथे कुत्र्यांना प्रवेश आहे. या कुत्र्यांसाठी एक विशेष निवास व्यवस्था ठेवली आहे. हे त्यांचे प्राणीप्रेम आणि त्यांची माणुसकीची भावना दर्शवते.

ह्या पाच गोष्टी तुम्हाला त्यांच्या आयुष्याच्या वेगळ्या बाजू दाखवतात, ज्यातून त्यांची माणुसकी, साधेपणा, आणि समाजाप्रती असलेली निष्ठा दिसते.

रतन टाटा यांचे १० प्रेरणादायी विचार –

 १ “ निर्णय घेण्यावर माझा विश्वास नाही. मी निर्णय घेतो आणि त्यांना योग्य बनवतो.”

२. “ तुम्हाला वेगाने चालायचे असेल, तर एकटे चाला. पण जर तुम्हाला लांब चालायचे असेल, तर एकत्र चाला.”

३. ” यश हे काही अंतिम ध्येय नाही, ते प्रवासाचे एक भाग आहे.”

४ “ जे गमावले आहे त्यावर तुम्ही लक्ष केंद्रित करू शकत नाही.”

५. “फक्त पैशांच्या मागे धावत जाऊ नका, त्याऐवजी समाजाला योगदान देण्यावर लक्ष केंद्रित करा.”

६. “ महान व्यापारी तो आहे जो अपयशाला घाबरत नाही.”

७. “ समस्या ह्या एक भेट आहेत ज्या समस्यांशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही.”

८. “स्वप्नं बघा आणि ती सत्यात उतरवण्यासाठी मेहनत करा.”

९. “ जोखीम न घेणे ही सर्वात मोठी जोखीम आहे.”

१० “ मी पैशांच्या मागे धावणारा व्यक्ती नाही, तर मूल्यांच्या मागे धावतो.”

Visit our Website biographykatta.com

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ) –

रतन टाटांचा जन्म कधी झाला?

रतन टाटा यांचा जन्म २८ डिसेंबर १९३७ रोजी झाला.

रतन टाटांनी कोणत्या विद्यापीठातून शिक्षण घेतले?

त्यांनी कॉर्नेल युनिव्हर्सिटीमधून आर्किटेक्चरमध्ये बॅचलर ऑफ सायन्स आणि हार्वर्ड बिझनेस स्कूलमधून अ‍ॅडव्हान्स्ड मॅनेजमेंट प्रोग्राम पूर्ण केला.

रतन टाटा पहिल्यांदा कोणत्या कंपनीत काम करत होते?

रतन टाटा यांनी टाटा स्टीलमध्ये पहिल्यांदा काम सुरू केले.

टाटा ग्रुपने कोणती महत्त्वाची उत्पादने लाँच केली?

टाटा इंडिका आणि टाटा नॅनो हे महत्त्वाचे उत्पादने लाँच केली.

रतन टाटा यांचा समाजसेवेमध्ये कसा सहभाग आहे?

त्यांनी ट्रस्ट्सच्या माध्यमातून शिक्षण, आरोग्य, आणि ग्रामीण विकासासाठी अनेक उपक्रम चालवले आहेत.

रतन टाटा यांना कोणते पुरस्कार प्राप्त झाले आहेत?

रतन टाटा यांना पद्म भूषण आणि पद्म विभुषण हे पुरस्कार मिळाले आहेत.

Keep Reading

Leave a Comment