रुतुराज गायकवाड हा एक भारतीय क्रिकेटपटू आहे, जो त्याच्या उत्तम फलंदाजीसाठी प्रसिद्ध आहे. त्याचा जन्म ३१ जानेवारी १९९७ रोजी महाराष्ट्रातील पुणे शहरात एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. त्याने आपल्या उत्कृष्ट खेळ कौशल्यामुळे भारतीय क्रिकेटमध्ये वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्याने आपल्या करिअरची सुरुवात महाराष्ट्र संघाकडून केली, आणि त्यानंतर त्याने आपल्या खेळाचे कौशल्य रणजी ट्रॉफी, सैयद मुश्ताक अली ट्रॉफी आणि विजय हजारे ट्रॉफी यांसारख्या देशांतर्गत स्पर्धांमध्ये दाखवली.
Table of Contents
पुर्ण नाव | रुतुराज दशरथ गायकवाड |
जन्म | ३१ जानेवारी १९९७ |
जन्मस्थान | पुणे, महाराष्ट्र, भारत |
शिक्षण | डिप्लोमा इन पॉलिटेक्निक |
वय | २७ वर्षे |
वडील | दशरथ गायकवाड (DRDO कर्मचारी) |
आई | सविता गायकवाड ( शिक्षिका )t |
पत्नी | उत्कर्षा पवार ( क्रिकेटर ) |
टोपननाव | रुतू, रुतुराज |
ऊंची आणि वजन | ५ फुट ९ इंच( १७५ सेमी ) आणि ६५ किलो |
धर्म – जात | हिंदू- मराठा |
संपत्ती | ३६ कोटी रुपये |
घरेलु टीम | महाराष्ट्र क्रिकेट टीम |
lPL टीम | चेन्नई सुपर किंग्स |
फलंदाजीची शैली | उजव्या हाताचा फलंदाज |
IPL पर्दापण | २२ सप्टेबर २०२० ( विरुद्ध राजस्थान रॉयल्स ) |
T20i पर्दापण | २८ जुलै २०२१ ( विरुद्ध श्रीलंका ) |
ODI पर्दापण | ६ ऑक्टोबर २०२२ ( विरुद्ध साऊथ आफ्रिका ) |
प्रारंभिक जीवन आणि क्रिकेटचे शिक्षण –
रुतुराजला लहानपणापासूनच क्रिकेटची आवड होती. त्याने ७ वर्षांचा असतानाच क्रिकेटची सुरुवात केली. त्याला पुण्यातील विविध स्थानिक मैदानांवर खेळण्याची संधी मिळाली. त्याच्या कुटुंबाचा पाठिंबा मिळाल्यामुळे त्याला खेळामध्ये प्रगती करणे सोपे झाले. त्याने पुण्यातील विठ्ठलराव तिळक विद्या मंदिर शाळेत शिक्षण घेतले. शालेय शिक्षण घेत असतानाच त्याने क्रिकेटच्या सरावाला प्राधान्य दिले. ११ वर्षांचा असताना त्याने पुण्यातील जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धांमध्ये भाग घेतला आणि त्याच्या खेळात सातत्याने सुधारणा केल्या. PCMC च्या दिलीप वेंगसरकर क्रिकेट अँकॅडमी मध्ये त्याला अधिक तांत्रिक मार्गदर्शन मिळाले, ज्यामुळे त्याच्या खेळातील गुणवत्ता वाढली.
कुटुंब –
रुतुराजचे वडील दशरथ गायकवाड हे DRDO मध्ये कर्मचारी होते, तर त्याची आई सविता गायकवाड शाळेत शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. रुतुराज हा पारगांव निमाणे गावांमधून येतो. कुटुंबाने रुतुराजच्या शिक्षणाकडे लक्ष दिले असले तरी त्याची क्रिकेटची आवड बालपणापासूनच दिसून आली. त्याच्या कुटुंबीयांनी त्याच्या क्रिकेटची आवड ओळखून त्याला या क्षेत्रात प्रोत्साहन दिले, आणि त्याच्यासाठी आवश्यक त्या सर्व सुविधा पुरवल्या.
क्रिकेट कारकिर्द –
रुतुराजने आपल्या प्रथम श्रेणी क्रिकेटची सुरुवात २०१६-१७ च्या रणजी ट्रॉफी हंगामात महाराष्ट्र संघाकडून केली. त्याने आपल्या पहिल्या काही सामन्यांमध्येच चांगली कामगिरी केली आणि महाराष्ट्र संघात एक महत्त्वाचा फलंदाज म्हणून ओळख निर्माण केली. त्याच्या टी-२० कारकिर्दीची सुरुवात २०१६-१७ सैयद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये झाली. त्यानंतर त्याने विजय हजारे ट्रॉफीमध्ये देखील उत्कृष्ट फलंदाजी केली, ज्यामुळे त्याची आयपीएल संघांकडून मागणी वाढली.
आयपीएल (IPL) पर्दापण –
रुतुराज गायकवाडची आयपीएल कारकिर्द २०१९ मध्ये चेन्नई सुपर किंग्स संघासोबत सुरू झाली. सुरुवातीला त्याला फार संधी मिळाली नाही, पण २०२० मध्ये त्याने आपल्या फलंदाजीमुळे सर्वांचे लक्ष वेधून घेतले. २०२१ चा IPL सत्र त्याच्यासाठी अत्यंत खास ठरला. या सत्रात त्याने आपले उत्कृष्ट फॉर्म दाखवत चेन्नई सुपर किंग्जसाठी सलामीला खेळताना दमदार कामगिरी केली. त्याने या सत्रात एकूण ६३५ धावा केल्या आणि ऑरेंज कॅप (सत्रातील सर्वाधिक धावा करणारा खेळाडू) मिळवली. या सत्रात त्याने १३६.२६ च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी करत एक शतक आणि चार अर्धशतक झळकावले. त्याच्या फलंदाजीत सातत्य आणि संयम दिसून आला. त्याच्या या कामगिरीमुळे चेन्नई सुपर किंग्जने २०२१ चा IPL चषक जिंकला, आणि त्याची लोकप्रियता वाढत गेली. IPL २०२२ मध्ये ३६८ धावा केल्या पण त्यांची सरासरी व स्ट्राईक रेट २०२१ सत्राच्या तुलनेत खुप कमी राहीला. आणि २०२३ मध्ये फॉर्म परत मिळवत ५०० हुन अधिक धावा केल्या. २०२४ ला त्यांला चेन्नई सुपर किंग संघाचा कर्णधार बनविण्यात आले. IPL २०२५ साठी झालेल्या ऑक्शन मध्ये चेन्नई सुपर किंगने १८ कोटी रुपये देऊन रुतुराजला आपल्या संघामध्ये परत घेतले.
भारतीय संघातील पदार्पण –
२०२१ च्या आयपीएल च्या चांगल्या कामगिरीनंतर त्यांला भारतीय संघात स्थान मिळाले. त्याने २०२१ मध्ये श्रीलंका दौऱ्यावर टी-२० फॉरमॅटमध्ये भारताकडून पदार्पण केले. त्यानंतर त्याला एकदिवसीय सामन्यांमध्येही संधी मिळाली. २०२२ साली रुतुराज च्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने एशियन गेम्स चे विजेतेपद जिंकले.
करिअरची आकडेवारी –
कसोटी | ODI | IPL | |
सामने | 0 | 6 | 66 |
इन्निग्स | 0 | 6 | 65 |
धावा | 0 | 115 | 2380 |
चेंडू | 0 | 157 | 1739 |
सवौत्तम | 0 | 71 | 108 |
सरासरी | 0 | 19.17 | 41.75 |
50s | 0 | 1 | 18 |
100s | 0 | 0 | 2 |
प्रेमजीवन –
भारतीय क्रिकेटपटू ऋतुराज गायकवाड आणि क्रिकेटर उत्कर्षा पवार यांचा विवाह ३ जून २०२३ रोजी महाराष्ट्रातील महाबळेश्वर येथे एक खासगी समारंभात संपन्न झाला. उत्कर्षा पवार, एक उत्तम ऑलराउंडर क्रिकेटपटू, महाराष्ट्राच्या महिला क्रिकेट संघाची खेळाडू असून गायकवाड यांच्या आयुष्यातील महत्त्वाचा भाग ठरली आहे. दोघांची मैत्री बर्याच काळापासून होती, आणि त्यानंतर ही मैत्रीचे प्रेमात रूपांतर झाले. विवाहाच्या काही दिवसांपूर्वीच गायकवाडने चेन्नई सुपर किंग्जसाठी आयपीएल २०२३ जिंकले होते. या विजयाचे उत्सव साजरे केल्यानंतर त्यांनी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमधून माघार घेत विवाहाच्या तयारीला लागला. त्यांच्या लग्न सोहळ्यात चेन्नई सुपर किंग्जमधील साथीदार प्राशंत सोलंकी आणि शिवम दुबे यांचीही उपस्थिती होती. रुतुराज गायकवाडने लग्नाच्या फोटोसह सोशल मीडियावर “फ्रॉम द पिच टू द अल्टर” असा खास संदेश लिहून आपल्या नव्या जीवनाची सुरुवात सांगितली.
प्रेरणा आणि आवड –
रुतुराज गायकवाडला क्रिकेटमध्ये सचिन तेंडुलकर आणि महेंद्रसिंग धोनी या दिग्गज खेळाडूंमधून प्रेरणा मिळाली आहे. धोनीसारखे शांत आणि संयमी राहून खेळावर लक्ष केंद्रित करणे हे त्याच्या खेळातील महत्वाचे गुण आहेत. त्याच्या खेळात संयम, आत्मविश्वास, आणि साधेपणा दिसतो. तो नेहमी धोनीच्या नेतृत्वशैलीचा आदर करतो.
कार कलेक्शन –
भारतीय क्रिकेटचा प्रतिभावान युवा फलंदाज रुतुराज गायकवाड मैदानावरील शानदार कामगिरीसाठी ओळखला जातो. परंतु क्रिकेटच्या पलीकडे त्याला आलिशान आणि स्टाइलिश कार्सची विशेष आवड आहे. त्याच्या कार कलेक्शनमध्ये काही आकर्षक आणि आलिशान कार्सचा समावेश आहे.
Mercedes-Benz C-Class
रुतुराजच्या कलेक्शनमधील प्रमुख कार्सपैकी एक म्हणजे मर्सिडीज-बेंझ सी-क्लास. ही कार त्याच्या स्टाइल आणि लक्झरीच्या आवडीची आहे. C-Class ही Mercedes ची एक प्रसिद्ध सीडान असून, तिच्या अद्वितीय डिझाइन, आरामदायक इन्टिरियर्स, आणि दमदार इंजिनमुळे ही लक्झरी कार लोकप्रिय आहे.
Range Rover Velar
रुतुराजच्या कार कलेक्शनमध्ये असलेली आणखी एक लक्झरी एसयूव्ही म्हणजे Range Rover Velar. Velar ही Range Rover ब्रँडची एक प्रतिष्ठित SUV आहे, ही गाडी विशेषतः ऑफ-रोडिंग क्षमतेसाठी ओळखली जाते. त्याच्या स्टाइलिश लुक आणि आलिशान इंटिरियरमुळे रुतुराजने ही SUV निवडली आहे.
Audi Q7
रुतुराजच्या कार कलेक्शनमध्ये ऑडी Q7 सारख्या लक्झरी SUV चा देखील समावेश आहे. Audi Q7 ही कार त्याच्या स्टाइलिश डिझाइनसाठी आणि प्रशस्त इंटिरियरसाठी प्रसिद्ध आहे. तिच्या पॉवरफुल इंजिनमुळे ही कार त्याला शहरातील प्रवासात तसेच लांबच्या प्रवासात आरामदायी वाटते.
Hyundai i20
क्रिकेटपटू असूनही त्याच्याकडे एक सामान्य आवडीची कार देखील आहे – Hyundai i20. ही कार त्याने आपल्या करिअरच्या सुरुवातीच्या काळात घेतली होती आणि ती त्याच्यासाठी एक भावनिक मूल्य ठेवते.
संपत्ती (Net worth) –
२०२४ मध्ये, रुतुराज गायकवाडची निव्वळ संपत्ती सुमारे ३६ कोटी रुपये आहे. यामध्ये त्याचा आयपीएल करार, भारतीय संघातून मिळणारे मानधन, सोशल मिडिया ब्रॅड प्रोमोशन आणि ब्रँड जाहिरातींमधून मिळणारे उत्पन्न यांचा समावेश आहे.
Visit Our website https://biographykatta.com
वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ) –
रुतुराज गायकवाड कोण आहे?
रुतुराज गायकवाड हा भारतीय क्रिकेट संघातील एक प्रतिभावान फलंदाज आहे. तो चेन्नई सुपर किंग्ज (CSK) संघातून इंडियन प्रीमियर लीग (IPL) मध्ये खेळतो. आपल्या उत्कृष्ट खेळामुळे तो भारतीय क्रिकेट चाहत्यांमध्ये लोकप्रिय आहे.
रुतुराज गायकवाडचा जन्म आणि शिक्षण कधी व कुठे झाले?
रुतुराज गायकवाडचा जन्म ३१ जानेवारी १९९७ रोजी पुणे, महाराष्ट्र येथे झाला. त्याने आपले शिक्षण पुण्यातून पूर्ण केले आहे.
रुतुराज गायकवाडची एकूण संपत्ती किती आहे?
२०२४ पर्यंत, त्यांची एकूण संपत्ती अंदाजे ३६ कोटी रुपयांच्या घरात आहे. त्याची संपत्ती मुख्यतः क्रिकेट, IPL करार, ‘BCCI करार, सोशल मिडिया ब्रॅड प्रोमोशन आणि ब्रँड एंडोर्समेंटमधून येते.
रुतुराज गायकवाड कोणत्या IPL संघासाठी खेळतो?
रुतुराज गायकवाड चेन्नई सुपर किंग्ज (CSK) संघासाठी खेळतो.
रुतुराज गायकवाडच्या विवाह झाला आहे का ?
२०२३ मध्ये रुतुराज गायकवाडने उत्कर्षा पवारशी विवाह केला, जी एक क्रिकेटपटू आहे. उत्कर्षा महाराष्ट्राच्या महिला क्रिकेट संघात खेळते.
रुतुराज गायकवाडची जात कोणती आहे?
रुतुराज गायकवाडची जात हिंदू – मराठा आहे.
रुतुराज गायकवाडला कोणत्या प्रकारच्या गाड्यांची आवड आहे?
रुतुराज गायकवाडला आलिशान आणि लक्झरी गाड्यांची आवड आहे. त्याच्या कार कलेक्शनमध्ये मर्सिडीज-बेंझ, BMW, आणि ऑडी सारख्या गाड्या आहेत.
रुतुराज गायकवाड भारतीय संघात कोणत्या फॉरमॅटमध्ये खेळतो?
रुतुराज गायकवाडने भारतीय संघासाठी मुख्यतः टी-२० आणि वनडे फॉरमॅटमध्ये खेळतो.