मराठी सिनेसृष्टीतील एक अशी जादूई व्यक्तीमत्त्व ज्यांच्या नावानेच प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर हास्य उमटते – ते म्हणजे अशोक सराफ. तब्बल पाच दशके अधिक काळ अभिनय क्षेत्रात आपल्या सहज, मनमोहक आणि विनोदी अभिनयाने त्यांनी लाखो प्रेक्षकांची मने जिंकली. ‘अशी ही बनवाबनवी’, ‘झपाटलेला’, ‘धुमधडाका’ अशा अजरामर चित्रपटांपासून ते ‘हम पांच’सारख्या लोकप्रिय मालिकांपर्यंत, त्यांनी प्रत्येक भूमिकेत जीव ओतला. २०२५ मध्येही त्यांच्या जुन्या चित्रपटांचा आनंद तितकाच ताजा वाटतो. चला तर जाणून घेऊया, त्यांच्या जीवन प्रवासाबद्दल !
Table of Contents :
जीवनचरित्र :

नाव | अशोक हेमराज सराफ |
जन्म | ४ जून १९४७ |
जन्मस्थान | चिखलवाडी, मुंबई |
वय | ७८ वर्षे |
व्यवसाय | अभिनेता, निर्माते |
उपनाम | अशोक मामा, महानायक |
उंची आणि वजन | ५ फुट १० इंच आणि ८० किलो |
पत्नी | निवेदिता जोशी सराफ (अभिनेत्री) |
मुलगा | अनिकेत सराफ |
मातृभाषा | मराठी |
चित्रपट पर्दापण | जानकी (१९६९) |
निव्वळ संपती | ३७ करोड |
प्रारंभिक जीवन व शिक्षण:
अशोक सराफ यांचा जन्म ४ जून १९४७ रोजी मुंबईतील एका मराठी कुटुंबात झाला. त्यांचे मूळ गाव “बेळगांव (कर्नाटक)” असले तरी त्यांचे संपूर्ण बालपण “दक्षिण मुंबईतील चिखलवाडी” या पारंपरिक मराठी वस्तीमध्ये गेले. त्यांचे वडील हेमराज सराफ हे व्यापारी होते. त्यांना लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती. त्यांचे मामा रघुवीर नेवरेकर हे स्वतः एक नाट्य अभिनेते होते. त्यांच्या प्रभावामुळेच अशोक सराफ यांना लहान वयातच रंगभूमीची ओढ लागली. त्यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण “डी.जी.टी. विद्यालय, मुंबई” येथे झाले. महाविद्यालयीन शिक्षण घेत असतानाच त्यांचा नाट्यक्षेत्रात रस वाढायला लागला. त्यांनी शालेय आणि कॉलेजच्या स्पर्धांमध्ये अनेक नाटके केली आणि अभिनयाचे कौशल्य विकसित केले.
Visit our website https://biographykatta.com
नाट्यक्षेत्रातील सुरुवात :
अशोक सराफ यांनी सुरुवात मराठी नाटकांमधून केली. त्यांच्या काही गाजलेल्या नाटकांमध्ये “सखाराम बाईंडर”, “झुंबा झुंबा”, “आंधळा मारतो डोळा”, “घरात माझं, बाहेर तुझं”, आणि “चारचौघी” यांचा समावेश होतो. त्यांच्या नाटकातील संवादफेक आणि टायमिंगमुळे प्रेक्षक खदखदून हसायचे.
चित्रपटसृष्टीतील यशस्वी वाटचाल :
अशोक सराफ यांनी मराठी चित्रपटसृष्टीत अनेक चित्रपटांत काम केले आहे. त्यांनी १९६९ पासून २०२५ पर्यंत जवळपास २५० हून अधिक मराठी चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यांनी लक्ष्मीकांत बेर्डे, सचिन पिळगांवकर, आणि महेश कोठारे यांच्यासोबत मिळून अनेक चित्रपटांमध्ये काम केले. ही चौकडी ८०-९० च्या दशकातील मराठी कॉमेडी सिनेमाचा “सुवर्णकाळ” ठरली. या कलाकारांनी एकत्रितपणे मराठी चित्रपटात लोकप्रिय विनोद शैली विकसित केली जी आजही प्रेक्षकांमध्ये प्रचंड आवडती आहे. मराठीतील काही लोकप्रिय चित्रपट खालीलप्रमाणे,
Visit our website https://biographykatta.com
गाजलेले मराठी चित्रपट :

- अशी ही बनवाबनवी
- धुमधडाका
- नवरा माझा नवसाचा
- गंमत जंमत
- आयत्या घरात घरोबा
- शेजारी शेजारी
- चंगू मंगू
- बाळाचे बाप ब्रह्मचारी
- एकापेक्षा एक
- गोंधळात गोंधळ
त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीत यशस्वी कामगिरी केल्यानंतर हिंदी सिनेमात सहाय्यक व विनोदी भूमिकांमधून प्रवेश केला. त्यांनी मुख्यतः ८०च्या दशकाच्या शेवटी व ९०च्या दशकात अनेक हिंदी चित्रपटांमध्ये लक्षवेधी भूमिका साकारल्या. काही हिंदी चित्रपट खालीलप्रमाणे,
हिंदी चित्रपट :
- करण अर्जुन
- यस बॉस
- सिंघम
- राजा
- प्यार किया तो डरना क्या
वैयक्तिक आयुष्य :
अशोक सराफ आणि निवेदिता जोशी यांची पहिली भेट रंगमंचाच्या निमित्ताने झाली. निवेदिता यांचे वडील गजानन जोशी हे स्वतः नाट्य क्षेत्रात कार्यरत होते आणि अशोक सराफ यांचे चांगले मित्र होते. त्यानंतर काही वर्षांनी ‘मामला पोरींचा’ या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान दोघांमध्ये पुन्हा संवाद सुरू झाला. त्या काळात त्यांचा अपघात झाला होता आणि ते काही काळासाठी शूटिंगपासून दूर होते. परत आल्यानंतर त्यांच्या कामातील समर्पण पाहून निवेदिता प्रभावित झाल्या आणि त्यांच्यातील मैत्री हळूहळू प्रेमात बदलली.
अशोक सराफ आणि निवेदिता यांच्यात १८ वर्षांचे वयाचे अंतर होते. त्यामुळे निवेदिता यांच्या कुटुंबीयांनी या नात्याला सुरुवातीला विरोध केला. विशेषतः त्यांच्या आईला चित्रपटसृष्टीतील व्यक्तीशी लग्न करणे योग्य वाटत नव्हते. सर्व अडथळ्यांवर मात करत, अशोक सराफ आणि निवेदिता यांनी ‘१९९० साली गोव्यातील मंगेशी मंदिरात’ अत्यंत साधेपणाने विवाह केला. या लग्नात फार मोठा थाट नव्हता, पण त्यामागे प्रेम, विश्वास आणि समर्पण होते.
अशोक सराफ आणि निवेदिता यांचा एकुलता एक मुलगा “अनिकेत सराफ” हा अभिनय क्षेत्रात नसून खाद्यपदार्थ व पाककला क्षेत्रात कार्यरत आहे. तो एक प्रशिक्षित ‘पेस्ट्री शेफ’ असून परदेशात शिक्षण घेतले आहे. अनिकेतने आपल्या करिअरसाठी वेगळी वाट निवडली असून तो सध्या भारतात आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर खाद्यसंस्कृतीशी संबंधित प्रकल्पांमध्ये कार्यरत आहे.
पुरस्कार व सन्मान :
- पद्मश्री (२०२५)
- महाराष्ट्र भूषण (२०२३)
- संगीत नाटक अकादमी पुरस्कार (२०२२)
- फिल्मफेअर मराठी जीवनगौरव पुरस्कार (२०१६)
- ११ राज्य पुरस्कार
- ४ फिल्मफेअर मराठी पुरस्कार
वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ) :
अशोक सराफ कोण आहेत?
त्यांनी मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेते आहेत. ते विशेषतः विनोदी भूमिकांसाठी ओळखले जातात. गेली ५५+ वर्षे ते अभिनय क्षेत्रात कार्यरत आहेत.
अशोक सराफ यांचा जन्म कधी आणि कुठे झाला?
त्यांचा जन्म ४ जून १९४७ रोजी मुंबई येथे झाला. त्यांचे मूळ गाव बेळगांव, कर्नाटक आहे.
अशोक सराफ यांना कोणते पुरस्कार मिळाले आहेत?
त्यांना पद्मश्री पुरस्कार, झी चित्र गौरव जीवनगौरव पुरस्कार, महाराष्ट्र शासन पुरस्कार, ‘संगीत नाटक ॲकॅडमी पुरस्कार, लोकमत चतुरंग पुरस्कार आणि अनेक सांस्कृतिक संस्थांचे सन्मान मिळाले आहेत.
अशोक सराफ यांना “हास्यसम्राट” का म्हटले जाते?
त्यांनी संवादफेक, चेहऱ्यावरील हावभाव, आणि विनोदी टायमिंग यामुळे ते प्रेक्षकांना खळखळून हसवतात. त्यामुळेच त्यांना “हास्यसम्राट” ही उपाधी मिळाली आहे.
अशोक सराफ यांची नेट वर्थ (एकूण संपत्ती) किती आहे?
२०२५ पर्यंत, एकुण संपत्ती अंदाजे ३७ करोड रुपये आहे.